*कोकण Express*
*भाजप नेते निलेश राणेंच्या माध्यमातून ५० टक्के सवलतीर वॉटर फिल्टर,अटाचकी(घरघंटी) वितरणाचा शुभारंभ*
*कुडाळ भाजपा कार्यलाय समोर आयोजन*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेशजी राणे यांच्या माध्यमातून ५० टक्के सवलतीवर देण्यात येणाऱ्या वॉटर फिल्टर आणि पीठ गिरणी (घरघंटी) वितरणाचा शुभारंभ आज सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष श्री अतुल काळसेकर यांच्या शुभहस्ते कुडाळ भाजपा कार्यालय प्रांगणात झाला. कुडाळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी ५० टक्के कमी किमतीत या वस्तू उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सवलतीची रक्कम निलेश राणे यांच्या माध्यमात कंपनीला देण्यात येणार आहे.
या योजनेच्या फायदा कुडाळ तालुक्यातील जास्तीत-जास्त नागरिकांनी घ्यावी असे आवाहन कुडाळ तालुका भाजपाच्या वतीने करण्यात आलं आहे. तर जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी सांगितले की काही अटी शर्ती लावत जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज सुविधा उपलब्ध करून देऊ या शुभारंभ प्रसंगी सभापती नुतून आईर, जिल्हा सरचिटणीस आनंद शिरवलकर, तालुका अध्यक्ष दादा साईल, जिल्हा महिला मोर्चा सौ संध्या तेरसे, शहराध्यक्ष राकेश कांदे, नगरसेवक विलास कुडाळकर, नगरसेवक ऍड. राजीव कुडाळकर, पंचायत समिती सदस्य संदेश नाईक,युवा मोर्चा अध्यक्ष पप्या तवटे, नगरसेवक निलेश परब, प्रशांत राणे,नगरसेविका सौ.प्राजक्ता शिरवलकर, सौ.नयना मांजरेकर तसेच देवेंद्र सामंत,राकेश नेमळेकर, अवधूत सामंत, वृणाल कुंभार, मनोरंजन सावंत,प्रितेश गुरव, सखू आकेरकर आदी उपस्थित होते.