३ फेब्रुवारी रोजी श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा

३ फेब्रुवारी रोजी श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा

*कोकण Express*

*३ फेब्रुवारी रोजी श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

महाराष्ट्र व गोवा राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या, सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान असलेल्या व ३६५ खेड्यांचा अधिपति असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा गुरुवार दि. ३ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे.
सावंतवाडीतील राजघराण्याचे दैवत असलेल्या या देवस्थानाचा वाढदिवस दरवर्षी मोठा उत्सव म्हणून साजरा होतो. यावर्षीही त्या निमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. गुरुवार ३ फेब्रुवारी रोजी सकाळी अभिषेक व पूजा, उत्सवनिमित्त पूजापाठ, त्यानंतर सर्व भाविकांना दर्शन व तिर्थप्रसाद, नामांकित भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तर सायंकाळी ७ वाजता सावंतवाडी येथील महापुरुष दशावतार नाट्यमंडळचा नाट्यप्रयोग होणार आहे.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर भाविकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व कोरोना नियमावलीचे पालन करून या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थानचे मानकरी विद्याधर नाईक शितप व शुभम नाईक शितप यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!