*कोकण Express*
*दळवी महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त ‘सुभाष दिवस’ साजरा*
*जिल्हास्तरीय व्यक्तिगत परेड स्पर्धेत एस.डी गटातून कु.आनंद वामन मोरे,कणकवली कॉलेज कणकवली प्रथम क्रमांक* .
*कासार्डे ः संजय भोसले*
तळेरे, येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयातील एनसीसी विभागाच्या वतीने ‘सुभाष दिवस’ साजरा करण्यात आला.
आभासी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मा. सुभेदार मेजर दिनेश गेदाम प्रमुख वक्ते तर प्रमुख पाहुणे मा. चंद्रकांत उर्फ राजू जठार, अध्यक्ष,आदर्श व्यापारी संघटना तळेरे, उपस्थित होते.
विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिन ‘सुभाष दिवस’ म्हणून साजरा करत असते. यादिवशी परेड स्पर्धा आयोजित केली जाते. कोविड-१९ नियमांचे पालन करत या वर्षी ही स्पर्धा जिल्ह्यास्तरीय व्यक्तिगत स्वरूपात आभासी पध्दतीने घेण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व दळवी महाविद्यालय गीता सोबत मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलित करून झाली.
श्री.हेमंत महाडीक, उपस्थितांचे स्वागत करून मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, “नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी युवकांमध्ये स्वातंत्र्याचे स्फुल्लींग चेतविले”.
प्रमुख वक्ते म्हणुन लाभलेले मा. सुभेदार मेजर दिनेश गेदाम
बोलतांना म्हणाले की, “नेताजी हे स्वातंत्र्य संग्रामातील अग्रणी नेता होते, त्यांनी दिलेला ‘जय हिंद’ चा नारा भारताचा नारा झाला आहे”.
प्रमुख पाहुणे मा. चंद्रकांत उर्फ राजू जठार या वेळी बोलतांना म्हणाले की, “एनसीसी मध्ये शिस्त, प्रामाणिकपणा सोबत वेळेला फार महत्व आहे. महाविद्यालयाचे मार्ग निर्देशक श्री. विनायक दळवी सर यांनी आखून दिल्या प्रमाणे महाविद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात याचा मला सार्थ अभिमान आहे. उत्तरोत्तर या महाविद्यालयाची प्रगती व्हावी”.
ट्रेंनिग जेसीओ नायब सुभेदार इंद्रकेश बटालियन हवालदार
मेजर सुरजित सिंग, ५८ महाराष्ट्र बटालियन
यांनी परीक्षक म्हणून कार्य पाहिले .
जिल्हास्तरीय वैयक्तिक परेड स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे घोषित करण्यात आला.
एस.डी गट प्रथम क्रमांक आनंद वामन मोरे,कणकवली कॉलेज कणकवली, द्वितीय क्रमांक श्रीराम संतोष गावडे बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला,
तृतीय क्रमांक नागेश दिनेश परब कणकवली कॉलेज कणकवली, चतुर्थ क्रमांक प्रतीक घाडीगावकर केळकर महाविद्यालय देवगड,
एस.डब्लु गट प्रथम क्रमांक अर्चना राजेंद्र पाटील
आनंदीबाई रावराणे कॉलेज वैभववाडी, द्वितीय क्रमांक दिव्या मधूकर नाटळकर कणकवली कॉलेज कणकवली, तृतीय क्रमांक वैष्णवी सिताराम शिरसाट श्री. पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी, चतुर्थ क्रमांक प्रतिक्षा गजानन गावडे श्री.पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट निलेश खरात याने केले तर आभारप्रदर्शन कु. मानसी कुडतरकर हिने केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

