*कोकण Express*
*ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वैभववाडी तालुका संघटनेच्यावतीने*
*कोरोना महामारीमध्ये उत्तम कामगिरी बजावलेल्या व्यक्तींचा गौरव*
*कासार्डे ः संजय भोसले*
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वैभववाडी तालुका संघटनेच्यावतीने कोरोना महामारीमध्ये युद्ध पातळीवर प्रत्यक्ष कोरोना प्रभावित क्षेत्रामध्ये काम केलेल्या नगरपंचायत वाभवे – वैभववाडीच्या सफाई कर्मचारी आणि इतर स्टाफ तसेच विशेषत: वैभववाडीचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
वैभववाडी नगरपंचायतींच्या सफाई कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात केलेल्या चांगल्या कामगिरीची आणि उचित कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानीत करण्यात आले.तसेच वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी केलेल्या उल्लेखणीय कामगिरी बद्दल त्यांचाही संघटनेच्या वतीने सन्मान पत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेने दिलेली कौतुकाची थाप निश्चितच प्रेरणादायी असल्याची कृतज्ञतेची भावना पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी यावेळी व्यक्त केली आणि सर्वांचे आभार मानले.
यावेळी माजी जि.प.सदस्य जयेंद्र रावराणे, ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे वैभववाडी तालुका अध्यक्ष व नवनिर्वाचित नगरसेवक संजय सावंत, नगरसेवक राजन तांबे,सदस्य संतोष टक्के,सचिन रावराणे, गणेश भोवड,अंकित सावंत आदी उपस्थित होते.