युवासेना आयोजित हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे चषक स्पर्धा उत्साहात संपन्न

युवासेना आयोजित हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे चषक स्पर्धा उत्साहात संपन्न

*कोकण  Express*

*युवासेना आयोजित हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे चषक स्पर्धा उत्साहात संपन्न*

*कणकवली ः संंजना हळदिवे*

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त युवासेना व पटकीदेवी मित्रमंडळ हरकूळ बुद्रुक सापळेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चषक भव्य क्रिकेट स्पर्धा 2022 उत्साहात संपन्न झाली.
या स्पर्धेचे उदघाटन कणकवली युवासेना उपशहरप्रमुख प्रतिक रासम यांच्या शुभहस्ते पार पडले. या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी दिगंबर सापळे, रमेश सापळे, सचिन सापळे, साम आर्डेकर, अशोक सापळे, सागर सापळे, बाळा सापळे, गिरीश पाटील, भूषण सापळे, अतुल घाडीगावकर, अनिरुद्ध सातवसे, प्रणित सापळे, गणेश सापळे, तेजस सापळे आदी युवासैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ डॉ.सुहास पावसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या स्पर्धेमधे कै.रमेश पावसकर ईलेव्हन संघाने विजेतेपद तर स्टार महापुरुष शिवडाव संघाने उपविजेतेपद पटकावले. या दोन्ही संघांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम चषक तसेच वैयक्तिक चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंना बक्षिसे देण्यात आली. या बक्षिस वितरण समारंभाला दिगंबर सापळे, मारुती सापळे, प्रकाश सापळे, प्रभाकर सापळे, श्रीकृष्ण सापळे, शाम आर्डेकर, रमेश सापळे, राहुल चव्हाण, योगेश सापळे, गिरीश पाटील आदी उपस्थित.
या स्पर्धेचे यशस्वी आयोजन युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडीगांवकर, युवासेना उपतालुकाप्रमुख नासिर खान यांच्या सहकार्यांने कणकवली युवासेना उपशहरप्रमुख प्रतिक रासम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!