*कोकण Express*
*नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या दालनामधील केंद्रीय मंत्री, आम. राणे यांची प्रतिमा उतरवली*
देवगड जामसंडे नगरपंचायतीवर महाविकास आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या दालनामधील केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांची छबी उतरवल्याने नगरपंचायतीमध्ये येणाऱ्या शहरवासीयांनी मधून उलट सुलट चर्चेचा विषय बनला आहे.
नगरपंचायतीवर आमदार राणे यांचे वर्चस्व असल्याने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या दालनामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्या छब्या लावण्यात आल्या होत्या. परंतु नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये नगरपंचायतवर महाविकास आघाडीने आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर भाजपच्या हातातून निसटता पराभव झाल्याने दालनात असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्या छब्या काढण्यात आल्या. सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर होणारा संघर्ष लक्षात घेता भाजप समर्थकांकडून छब्या आधीच सन्मानाने काढल्याचे बोलले जात आहे. परंतु नगरपंचायत दालनात विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये मात्र एकच चर्चा रंगली आहे की ? नगरपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता बसणार की काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात असला तरी शहरवासी यांमधून उलट-सुलट चर्चेला उधाण येत आहे.