*कोकण Express*
*26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून फोंडाघाट शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन*
*फोंडाघाट ः संंजना हळदिवे*
फोंडाघाट शिवाजी तरुण मंडळ बिजलीनगर तर्फे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सालाबाद प्रमाणे श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली असून या पूजेला चाळीस वर्षे पूर्ण झालेली आहेत तरी फोंडाघाट वासियांनी सत्यनारायण महापूजेच्या प्रसादाचा लाभ घ्यावा. सकाळी सत्यनारायणाची पूजेचे आयोजन आणि दुपारी दोन नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. बिजलीनगर महिलांच्या वतीने संध्याकाळी सहा वाजता हळदी कुंकू चा कार्यक्रम होणार आहे. तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन आणि रात्री नऊ वाजता सर्वांनी तिरंगी भजनाचा सामन्याचा आस्वाद घ्या हे आव्हान मंडळाचे अध्यक्ष यांनी केले आहे.


