कोकिसरे बांधवाडी येथे १०५ ग्रामस्थांना ई-श्रम कार्डचे मोफत वाटप

कोकिसरे बांधवाडी येथे १०५ ग्रामस्थांना ई-श्रम कार्डचे मोफत वाटप

*कोकण Express*

*कोकिसरे बांधवाडी येथे १०५ ग्रामस्थांना ई-श्रम कार्डचे मोफत वाटप*

*स्व.बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त वैभववाडी तालुका शिवसेनेच्या वतीने उपक्रमाचे आयोजन*

*वैभववाडी ः  प्रतिनिधी*

स्वर्गीय शिवसेनाप्रमुख हिंदुह्रदयसम्राट व शिवसैनिकांचे दैवत वंदनीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वैभववाडी शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या सौजन्याने कोकिसरे बांधवाडी येथील शिवसेना पदाधिकारी यांच्या मागणीनुसार बांधवाडीतील १०५ ग्रामस्थांना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांच्या हस्ते ई – श्रम कार्डचे मोफत वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, शिवसेना उपविभागप्रमुख राजेश तावडे, युवासेना कार्यकर्ते सिद्धू गावडे, बांधवाडी शाखाप्रमुख यशवंत गवाणकर, तालुका कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत आम्रसकर, माजी उपसरपंच श्रीकांत डाफळे, राजाराम गडकर, महिला शाखाप्रमुख उज्वला राणे. युवा सेना प्रमुख गुरुनाथ आम्रसकर, महिला उपशाखाप्रमुख वनिता करंबळे, गटप्रमुख दीपक अम्रसकर, शाखा संघटक सूर्यकांत मणगेकर, सुरेश उर्फ बाळा पाळये, रमेश नारकर आदी पदाधिकारी व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!