*कोकण Express*
*संजय गांधी निराधार समितीची बैठक वैभववाडीत संपन्न*
*संजय गांधी निराधार योजनेतील ३९ प्रकरणे करण्यात आली मंजूर*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
संजय गांधी निराधार समितीची बैठक वैभववाडी तहसीलकार्यालयात आज समितीचे अध्यक्ष मंगेश लोके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी संजय गांधी विधवा योजनेमध्ये १९, संजय गांधी अपंग योजनेमध्ये ०४, संजय गांधी श्रावणबाळ अ व ब योजनेमध्ये १५, संजय गांधी निराधार योजना ०१ अशी ३९ प्रकरणे मंजूर करण्यात आली. समितीतील सदस्यांनी आपापल्या भागातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून या सर्व योजनेचा उर्वरित लाभार्थ्यांना कसा लाभ मिळेल याकडे लक्ष देऊन प्रस्ताव सादर करावेत; जेणेकरून कुठल्याही दुर्गम भागातील लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये असे आवाहन मंगेश लोके यांनी केले.
यावेळी संजय गांधी निराधार समितीचे सचिव तथा तहसीलदार रामदास झळके, नायब तहसीलदार अशोक नाईक, गट विकास अधिकारी जयप्रकाश परब, नगरपंचायत मुख्याधिकारी सुरज कांबळे, समिती सदस्य स्वप्नील धुरी, रवींद्र पवार, सुरेश पांचाळ, शंकर कोकरे, श्रीकृष्ण साईल, राजेश तावडे, भालचंद्र जाधव, सारिका सुतार, संजय गांधी शाखेचे अव्वल कारकून चव्हाण व लिपिक बाकडे आदी उपस्थित होते.


