आमदार नितेश राणेंची आज पुन्हा पोलीस चौकशी

आमदार नितेश राणेंची आज पुन्हा पोलीस चौकशी

*कोकण Express*

*आमदार नितेश राणेंची आज पुन्हा पोलीस चौकशी*

*कणकवली: मयुर ठाकूर*

संतोष परब याप्रकरणी आमदार नितेश राणे कणकवली पोलिस ठाण्यात आज मंगळवार २५ जानेवारी रोजी पुन्हा चौकशीसाठी हजर झाले होते. सकाळच्या सत्रात तब्बल 40 मिनिटाहून जास्त वेळ त्यांची चौकशी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्यासमवेत करण्यात आली. यावेळी आमदार राणे यांच्यासोबत त्यांचे वकील संग्राम देसाई हेदेखील उपस्थित होते.

जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर शिवसेनेच्यावतीने आरोप करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते आणि आज सकाळी 11.30 ते 12.10 पर्यंत म्हणजे तब्बल चाळीस मिनिटे त्यांची चौकशी कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्याकडून करण्यात आली. त्यामुळे आमदार नितेश राणे हे तपास कार्याला सहकार्य करत असल्याचे दिसून येत आहे. काल सोमवारीदेखील सकाळी आमदार नितेश राणे हे कणकवली पोलिस स्थानकात दाखल होऊन तब्बल दीड तास पोलिसांनी त्यांची चौकशी केली होती. त्या वेळी आमदार नितेश राणे यांनी देखील पोलिसांना सहकार्य करणार असल्याचे सांगितले होते. आज पुन्हा ते कणकवली पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!