सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी सहकारी पतसंस्थेच्या तळेरे येथील सभासद सुविधा केंद्राचा उद्या २६ जानेवारी रोजी शुभारंभ

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी सहकारी पतसंस्थेच्या तळेरे येथील सभासद सुविधा केंद्राचा उद्या २६ जानेवारी रोजी शुभारंभ

*कोकण Express*

*सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी सहकारी पतसंस्थेच्या तळेरे येथील सभासद सुविधा केंद्राचा उद्या २६ जानेवारी रोजी शुभारंभ*

*कासार्डे ः  संजय भोसले*

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी सहकारी पतसंस्था मर्या.च्या तळेरे येथील सभासद सुविधा केंद्राचा शुभारंभ उद्या बुधवार दिनांक २६ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपन्न होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन वाळके आणि उपाध्यक्ष प्रकाश वाळके यांच्या शुभहस्ते या केंद्राचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर, जि. प. सदस्य रवींद्र ऊर्फ बाळा जठार, पंचायत समिती सदस्य दिलीप तळेकर, तळेरे सरपंच सौ.साक्षी सुर्वे, तळेरे उपसरपंच दिनेश मुद्रस हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तळेरे येथील एस.टी.बसस्थानका शेजारील विनोद धुरे यांच्या जुन्या बिल्डिंगमध्ये, पहिला मजला, धनंजय मेडिकल स्टोअरच्या वरती हे केंद्र सुरु होणार असून त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तरी या उद्घाटन सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन आदर्श व्यापारी संघटना तळेरे चे अध्यक्ष अध्यक्ष राजू जठार, सेक्रेटरी आप्पा कल्याणकरकल्याणकर आणि केंद्राचे विकास अधिकारी प्रतिक वरूणकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!