*कोकण Express*
*सत्ताधाऱ्यांनी ऊस शेतकऱ्यांच्या एका गाडीला १७०० रुपये जिजिया कर थांबवावा :राजन तेली*
*खराब रस्त्यांपायी शेतकऱ्यांना भुर्दंड कशाला?*
*दीपक केसरकरांनी राजकारण थांबवावे…!*
*कणकवली : मयुर ठाकूर*
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा अंकुश नाही.ऊस तोडणी हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले.तो संपत आला तरी ऊस तोडणी टोळ्या आलेल्या नाहीत. गगनबावडा घाटरस्ता नादुरुस्त आहे, हमाल,ऊसतोड मजूर अशा सर्व गोष्टींसाठी १७०० रुपये एका गाडीला शेतकऱ्यांना भुर्दंड बसत आहे.आता २४५ कोटी कर्ज जिल्हा बँकेने डी.वाय.पाटील कारखान्याला दिले आहेत.मात्र शेतकऱ्यांना नुकसानीकडे कारखाना लक्ष देत नसल्याचा आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला.कणकवली येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख बबलू सावंत उपस्थित होते.
माजी राज्यमंत्री दीपक केसरकर कसे अपयशी ठरले, हे जनतेला माहीत आहेत.सावंतवाडी नगरपालिका डोळ्यासमोर ठेवून क्रीडांगणाचे राजकारण करत आहेत.क्रीडांगण सावंतवाडी मध्ये नवीन घ्या.तुमची सत्ता आहे त्यामुळे जुने उगाळत बसून बंदा येथील क्रीडांगण सावंतवाडी शहरात हलविण्याचा घाट घालण्यापेक्षा आणखीन एका क्रीडांगणाला मंजुरी मिळवून घ्या.गेली तीन वर्षे मल्टिपर्पज हॉस्पिटल करत आहात.हे सावंतवाडी येथील जनता पाहत आहे.त्यामुळे आतातरी जनतेची दिशाभूल थांबवा.जेव्हा राज्यमंत्री होता तेव्हा वेंगुर्ले, सावंतवाडी आणि दोडामार्ग नगरपंचायत भाजपाने जिंकलेली आहे.आता दोडामार्ग पासून पुन्हा सुरवात केली आहे.भविष्यात सुद्धा सावंतवाडी नागरपालिकेवर भाजपची सत्ता प्रस्थापित होईल,असा राजन तेली यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि कोल्हापूरचे पालकमंत्री बंटी पाटील हे या शेकऱ्यांच्या नुकसानीकडे लक्ष देत नाहीत. आज गैरसोयी मुळे सिंधुदुर्ग ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होणारे नुकसान न थांबल्यास भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा राजन तेली यांनी दिला.
जिल्हा नियोजनच्या कामांचा बदल मागवून केला जातो.जिल्हा परिषद आणि भाजपा म्हणून,जिल्हा परिषद पदाधिकारी यांनी लोकांच्या हितासाठी कामे मागितली ती पूर्ण नकरता परस्पर बदलली जातात.हे थांबवा अन्यथा आंदोलन करावे लागेल.पूरग्रस्त निधी मधील कामे बदलण्याचा अधिकार पालकमंत्री यांना नाही असे नाही ती बदलली गेली.पूरग्रस्त कुठची गावे आहेत हे जिल्हा परिषद सदस्य यांना माहीत आहे.त्यांनी सूचित केलेली कामे पालकमंत्री यांनी बदलली आहेत आम्ही न्यायालयात जाणार आहेत.त्यामुळे ही कामे बदळणाऱ्यांनी आपला निर्णय बदलावा असा इशारा राजन तेली यांनी दिला.
तिलारी धरण हे अधिकऱ्याना कुरण आहे.मोठी कामे बाहेरील जिल्हातील ठेकेदाराला दिली जातात. ठेकेदार आणि अधिकारी यांच्यातील साठे लोटे थांबवा.मुख्यमंत्री सडक व अन्य रस्ते विकास कामात भ्रष्टाचार होत आहे .ती कामे चांगली व्हावीत अन्यथा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा राजन तेली यांनी दिला आहे.

