*कोकण Express*
*जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला*
*नितेश राणेंचे पीए राकेश परब यांच्यासमोरही अटकेची टांगती तलवार*
*संतोष परब हल्ला प्रकरण*
*कणकवली : मयुर ठाकूर*
शिवसैनिक संतोष परब हल्ल्यातील आरोपी असलेले आमदार नितेश राणेंचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा प्रधान न्यायालयाने आज फेटाळला.
संतोष परब वरील जीवघेण्या हल्ल्यात राकेश परब हे संशयित आरोपी आहेत. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर होण्यासाठी राकेश परब यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर आज जिल्हा प्रधान न्यायालयाने निकाल दिला. जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर राकेश परब यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. अटक टाळण्यासाठी राकेश परब याना आता हायकोर्टात धाव घ्यावी लागणार आहे.