*कोकण Express*
*वेंगुर्ला तालुका शिवसेनेने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत हंसिका, दिव्यता व सायली प्रथम…*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
हिंदुहृदयसम्राट तथा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त वेंगुर्ला तालुका शिवसेनेने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत खुल्या गटात दिव्यता सिताराम मसुरकर, शालेय गटामध्ये हंसिका जगन्नाथ वजराटकर हिने तर खुला गट चित्रकला स्पर्धेत सायली मिलिंद भैरे यांनी प्रथम क्रमांक पटकावले.
वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्यावतीने सर्वप्रथम जिल्हाप्रमुख संजय पडते व तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी हिंदुहृदयसम्राट तथा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली त्यानंतर स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये वक्तृत्व स्पर्धा शालेय गट-प्रथम हंसिका जगन्नाथ वजराटकर, द्वितीय- पूर्वा रामदास चांदेरकर, तृतिय-प्रचिती विकास शेटये, उत्तेजनार्थ-शमिका सचिन चिपकर, पूर्वी साळगावकर. खुला गट- प्रथम दिव्यता सिताराम मसुरकर, द्वितीय-साईशा विठ्ठल केळजी, तृतीय-विराज गणेश आरावंदेकर, उत्तेजनार्थ -पूजा शरद राऊळ, पल्लवी प्रकाश पेडणेकर यांनी क्रमांक पटकविला. या स्पर्धेचे परिक्षण बी. टी. खडपकर व अजित राऊळ यांनी केले.
चित्रकला स्पर्धा-खुला गट-प्रथम- सायली मिलिंद भैरे, द्वितीय- विष्णूप्रसाद संतोष सावंत, तृतीय-तुकाराम दिपक गोसावी, उत्तेजनार्थ-पूर्वा रामदास चांदेरकर, नितीश साबाजी करंगुटकर यांनी पटकाविला. तर विशेष वैशाली मृत्युंजय परब हिला देण्यात आले. या स्पर्धेचे परिक्षण पंकज घोगळे व योगेश खवणेकर यांनी केले.
विजेत्यांना शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, शहर प्रमुख अजित राऊळ, सचिन वालावलकर, महिला संघटक सुकन्या नरसुले, मंजुषा आरोलकर, विवेकानंद आरोलकर, पंकज शिरसाट, सुरेश भोसले, गजानन गोलतकर, दादा सारंग, दिलिप राणे, अभि मांजरेकर यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.