*कोकण Express*
*भाजपाच्या कुडाळ नगरपंचायत गटनेतेपदी विलास कुडाळकर यांची नियुक्ती…*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
भाजपाच्या वतीने सिद्धिविनायक नगर विकास गटाची स्थापना तर गटनेतेपदी नवनिर्वाचित नगरसेवक विलास कुडाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना माजी नगराध्यक्ष तथा भाजपा तालुका अध्यक्ष विनायक राणे, जिल्हा परिषदेचे गटनेते रणजीत देसाई, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ.संध्या तेरसे, जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शहराध्यक्ष राकेश कांदे,नगरसेवक निलेश परब,नगरसेवक अभिषेक गावडे, नगरसेवक ऍड राजीव कुडाळकर, महिला नगरसेविका सौ.प्राजक्ता शिरवलकर,सौ नयना मांजरेकर,कु चांदणी कांबळी,तसेच रुपेश कानडे, राकेश नेमळेकर,राजवीर पाटील,सचिन तेंडुलकर, सचिन पालकर आदी उपस्थित होते.