*कोकण Express*
*शॉर्ट सर्किटनंं लागली आग*
*३०० काजू कलमंं झाली खाक*
*दोडामार्ग ः लवू परब*
दोडामार्ग गोवेकर कॉलनी येथील येथील उज्वला वासुदेव गोवेकर यांच्या काजू बागेला ११ केव्ही शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत सुमारे ३०० हुन अधिक काजू कलमे होरपळून गेल्याने त्यांचे लाखोंच नुकसान झाले आहे. एन मोहर आलेला असताना संपूर्ण काजू बाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने या काजू बागायतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ११ केव्ही शॉर्ट सर्किट होऊन नुकसान झाल्याने एमएसइबीने पंचनामा करून तत्काळ भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
एमएसईबीने खरे तर अशा जुनाट वाहिन्यांची तपासणी करणे आवश्यक असताना तसे होत नसल्याने हे असे अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. रविवारी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. ११ केव्ही शॉर्ट सर्किट होऊन त्या बागेत जमिनीवर तुटून पडल्या व यात गोवेकर यांच्या काजू बागायतींचं अतोनात नुकसान झाले. अथक मेहनत करून उभी केलेली ७ ते १० वर्षांची बहरलेली झाडे या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. दोडामार्ग गोवेकर कॉलनीच्या मागे असलेल्या बागायतीचं यात मोठं नुकसान झाले. सुमारे ३०० काजू कलमे, पाण्यासाठी वापरण्यात येणारे ३०० मीटर वर असलेली हत्ती पाईप लाईन आणि केरोसीन पपं सुद्धा या आगीत जाळल्याने मोठं नुकसान झालं आहे. झाला प्रकार लक्षात येताच या बागायती करणारा शेतकरी, मालक गोवेकर, शैलेश गोवेकर ही मंडळी बागायतीत पोहचली तोवर होत्याचे नव्हते झाले होते. त्यानंतर वीज वितरण च्या कर्मचारी घटनास्थळी पाहचले होते. मात्र झालेल्या नुकसानीची रीतसर पंचनामा प्रक्रिया करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.