*कोकण Express*
*देवगडात शिवसेनेनंं बाळासाहेबांना वाहिली जयंतीनिमित्त आदरांजली*
*देवगड ः प्रतिनिधी*
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जयंती देवगड तालुका शिवसेनेच्या वतीने रविवारी सकाळी देवगड तालुका शिवसेना संपर्क कार्यालय या ठिकाणी साजरा करण्यात आला. नवनिर्वाचित नगरसेवक नितीन बांदेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर ज्येष्ठ शिवसैनिक दादा पडेलकर यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व उपस्थित शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक यांनी अभिवादन केले.