*पकड मोहीम राबवत भटक्या कुत्र्यांची नसबंदी, शस्त्रक्रिया करून नियोजन*
*जिल्ह्यातील न.पं.चा पहिलाच प्रयोग*
*नगराध्यक्ष समीर नलावडे*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली नगरपंचायत क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव थांबविण्यासाठी आमचे नियोजन आहे. कणकवलीत आम्ही कुत्रे पकडणाऱ्या व ‘त्या’ कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करून पुन्हा त्यांना त्याच परिसरात सोडण्यात येणार आहे. त्यांची निविदा प्रक्रिया लवकरच करण्यात येईल, अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, आरोग्य सभापती अभिजित मुसळे, नगरसेवक विराज भोसले, मेघा गांगण, अण्णा कोदे, प्रणाम कामत, अजय गांगण, किशोर राणे व नगरपंचायत कर्मचारी किशोर धुमाळे, सतीश कांबळे, श्री.खैरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
भटक्या कुत्राच्या पप्रदर्भाव वाढला होता. भटके कुत्र्यांचा उपद्रव वाढला होता. नगरपंचायत क्षेत्रात वाढलेले कुत्रे उपाययोजना करणार आहोत.५ दिवसांत टेंडर काढलं जाईल. शासनाचे नियम पाळून ही प्रक्रिया होईल. निल सावंत याला चावा भटक्या कुत्र्यांनी घेतला होता. त्याची मुख्याधिकारी यांना माहिती दिली आहे. त्यांनी निविदा प्रक्रिया करण्याच्या सूचना केल्या आहेत.
त्यानुसार, काही संस्थाशी आम्ही संपर्क साधला आहे. दोन सोसायटी फॉर अँनिमल प्रोटेक्शन, नागपूर व अँनिमल फ्रेंड वेलफेअर पब्लिक सोसायटी, ठाणे या दोन संस्था आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला आहे, त्यानुसार निविदा नुसार पर कुत्रा खर्च होईल.
भटक्या कुत्र्यांना पकडून नर जातींचा कुत्र्यांना ५ ते ३ दिवसात सोडणार येणार आहे. त्यावेळी त्यांना टँग लावून सोडले जाणार आहे. तसेच नर जातीचा पेस्टी व मादी असेल तर गर्भाशय काढले जाणार आहे.
तर शासनाचा दर असेल त्याप्रमाणे निविदा होईल. चार – पाच दिवसांत निविदा होईल. यावेळी कमी दर असेल त्यांना निविदा दिली जाईल. तर नगरपंचायतच्यावतीने पाणी, जागा, शस्त्रक्रिया, लाईट व्यवस्था करण्यात येईल. सोबत उत्पत्ती थांबण्याची प्रक्रिया होईल. त्यामुळे किमान दोन वर्षात त्यांचा प्रतिसाद दिसेल. सद्या भटक्या कुत्र्याची संख्या सुमारे ५०० पेक्षा जास्त आहेत. त्याचाही सर्वे केला जाईल. त्यानुसार कुत्रे पकड मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्व प्रक्रिया लवकरच केली जाईल, असे समीर नलावडे यांनी सांगितले.
रेबीज असलेल्या भटक्या मारण्यात येईल. त्यासाठी आमची तयारी आहे. सर्व जबाबदारी आम्ही घेऊ, आ.नितेश राणे यांनी आपली जनावली येथील जागा देण्यात येणार आहे. तसेच त्या भटक्या कुत्र्यांना शांत होण्यासाठी इंजेक्शन देण्यात येईल. त्याचा फायदा नागरिकांना होईल. पण पकडले कुत्रे त्याच भागात सोडले जातील. संपूर्ण जबाबदारी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांची आहे, असे समीर नलावडे यांनी सांगितले.
तसेच मोकाट जनावरे शहरात मोठ्या प्रमाणात आहेत. नरडवे रोडवर थांबतात, चरण्यासाठी ही गुरे जातात. ती गुरे आमच्या ग्रामीण भागातील आहेत,असे शेतकरी सांगतात. त्यामुळे कणकवलीत नरडवे रोडवर काही गुरांचा मार्ग आहे, त्याबाबत आम्ही दक्ष आहोत असे समीर नलावडे यांनी सांगितले.
