*कोकण Express*
*रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव च्या कार्यकर्त्यानी घोणसरी तील कोव्हीडबाधित मृतदेहावर केले अंत्यसंस्कार*
*कणकवली : मयुर ठाकूर*
वसानिःस्वार्थीमाणुसकीचा, निस्सीम_समाजसेवेचा…. या उक्तीप्रमाणे देवगड तालुक्यातील “रामेश्वर प्रतिष्ठान”मिठबावचे कार्यकर्ते गेली दोन वर्षे कार्यरत आहेत. आतपर्यंत सुमारे ४०-४२ कोरोना बाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार मिठबाव सरपंच भाई नरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहेत.२२ जानेवारीला कणकवली-घोणसरी येथील श्यामराव रघुनाथ पांचाळयां यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करत एक समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
कोरोना बाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावातील लोक, नातेवाईक पुढे येत नाहीत. त्यावेळी जीवाची बाजी लावत मिठबाव सरपंच भाई नरे व सहकारी रामेश्वर प्रतिष्ठान मिठबावच्या माध्यमातून काम करत आहेत. देवगड तालुक्यातून तब्बल ६० किलोमीटर कणकवली घोणसरी येथे येत त्यांनी कोरोना बाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत.