सर्पमित्र पंढरी वायंगणकर यांनी अजगराला दिले जीवदान

सर्पमित्र पंढरी वायंगणकर यांनी अजगराला दिले जीवदान

*कोकण Express*

*सर्पमित्र पंढरी वायंगणकर यांनी अजगराला दिले जीवदान*

*कणकवली :मयुर ठाकूर*

कणकवली तालुक्यातील असलदे धनगरवाडी येथील लक्ष्मी वरक यांच्या घराजवळ कोंबडीसाठी अजगर आला असता राजा परब यांनी सर्प मित्र असलेले असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांना फोन करून सदर अजगारबाबत माहिती दिली असता पंढरी वायंगणकर यांनी तातडीने तेथे येत अजगारला जीवंत पकडले यावेळी त्यांच्या समवेत तुकाराम तुप्पट मदतीला होते .सदर अजगाराला पकडून जंगलात जाऊन सोडून दिले.

पंढरी वायंगणकर यांनी सर्प मित्र हे इयत्ता 9 वी मध्ये असताना सर्प कसे पकडावे यांचे प्रशिक्षण. कुभंवडे विद्यालयातून शिंत्रे सर यांच्या कडून घेतले होते यानंतर त्यांनी नांदगाव परीसरात बरेच छोटे मोठे साप पकडून जंगलात नेऊन सोडले होते.

यांच्या सोबत तुकाराम तुप्पट, शैलेश टाकळे,भाई मोरजकर, कमलेश पाटील,राजा कांडर , श्रीराम मोरजकर ,प्रभाकर चिके , श्रीकृष्ण वायंगणकर आदी जंगलात सोडून देण्यासाठी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!