*कोकण Express*
*शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी सार्वजनिक सुट्टी जाहिर करा*
*शिवसेना कणकवली संपर्कप्रमुख शंकर पार्सेकर यांची मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
हिंदूहदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी कणकवली शिवसेना सपर्कप्रमुख शंकर पार्सेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण विश्वात एक कट्टर हिंदुत्ववादी नेते म्हणून प्रसिद्ध होते. हिंदुस्थानात एकमेव कट्टर हिंदुत्व पुरस्कर्ते नेते थोर भारतीय नेते आहेत. त्यांच्या जन्म दिनी महाराष्ट्र मध्ये इतर नेत्या प्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी सरकारी पातळीवर सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. व वंदनीय साहेबाना आदरांजली अर्पण करावी. अशी मागणी श्री पार्सेकर यांनी केली आहे.