वैभवावाडीत शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली

*कोकण Express*

*वैभवावाडीत शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली..*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

तालुका शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेस पुष्पहार पुष्पहार अर्पण करून त्यांचे पवित्रस्मृतीस आदरांजली वाहण्यात आली.

जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संभाजी रावराणे यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, शहर प्रमुख प्रदीप रावराणे, उपतालुका प्रमुख दिलीप नारकर, उपशहर प्रमुख सुनील रावराणे, विभागप्रमुख विठोजी पाटील, कमलाकर सरवणकर, गोविंद जांभवडेकर, विलास माळकर, प्रवीण गायकवाड, दिपक पवार, गणेश पवार आदी पदाधिकरी व शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!