‘निगा डायबेटीक फुट केअर’ क्लिनीकचा शुभारंभ

‘निगा डायबेटीक फुट केअर’ क्लिनीकचा शुभारंभ

*कोकण  Express*

*‘निगा डायबेटीक फुट केअर’ क्लिनीकचा शुभारंभ*

*डॉ अनंत नागवेकर, डॉ कीर्ती नागवेकर यांच्या हस्ते झाले उदघाटन

*कणकवली ः संंजना हळदिवे*

डॉ. नागवेकर हॉस्पिटल अँड नर्सिंग होम येथे दुसऱ्या मजल्यावर अद्यायावत व सर्व सोईंनीयुक्त असे ‘निगा डायबेटीक फुट केअर क्लिनीकचा शुभारंभ क्लिनीकचे डायरेक्टर डॉ. अनंत नागवेकर व डॉ. किर्ती नागवेकर यांच्या हस्ते करण्यात आला. नागवेकर हॉस्पिटल अँड नर्सिंग होमच्या दुसऱ्या मजल्यावर सर्व सोई सुविधायुक्त असा हा विभाग सुरू करण्यात आला आहे.

यावेळी मुंबईतील प्रख्यात डॉ. विठ्ठल पटेल, डॉ. प्रशांत मडव, डॉ. मयूर नागवेकर, डॉ. मिनल नागवेकर, डॉ. गार्गी ओरोसकर व नागवेकर हॉस्पिटलची टीम उपस्थित होते. या क्लिनीकमध्ये स्वतः डॉ अनंत नागवेकर यांच्या सोबत मुंबईतील प्रख्यात डॉ. विठ्ठल पटेल, डॉ. प्रशांत मडव, डॉ. मयूर नागवेकर, डॉ. रघुनाथ (अमोल) नागवेकर, डॉ. गार्गी ओरोसकर सल्ला देण्यासाठी उपलब्ध असतील. तसेच दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी ही संपूर्ण तज्ञ डॉक्टरांची टीम निगा डायबेटिक फूट क्लिनिक मध्ये रुग्णांची तपासणी करतील.

मधुमेह म्हटला की त्यासोबत अन्य आजार पण सोबत येतात. त्यामुळे अशा आजारांची काळजी आपण घेणे आवश्यक असते. आज मधुमेही रुग्णांमध्ये पायांचे बरेच आजार आढळतात. त्यावर योग्य वेळी उपचार न केल्याने पायांना जखमा होणे, त्या चिघळने आणि मग तो भाग कापून टाकण्यापर्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होते. आधीच शारीरिक आणि मानसिक रित्या खचलेल्या या रुग्णांसाठी हा अजून एक मोठा घाव असतो. याच अनुषंगाने अशी गंमीर उद्भवणारी परिस्थिती आपण हे टाळू शकतो का? मधुमेहींचा हा शारीरिक भाग कापून टाकणे आपण थांबवू शकतो का? असा विचार डॉ. अनंत नागवेकर यांच्या मनात आला आणि त्यासाठी या क्षेत्रातील विविध तज्ञांचा सल्ला घेतला. त्यानंतरच जिल्हयात अतिशय अद्यावत अशा ‘निगा डायबेटिक फूट क्लीनिक ची save limb save life ( पाय वाचवा आयुष्य वाचवा) हे धेय घेऊन सुरुवात होत आहे.

पायांच्या तपासणीसाठी लागणाऱ्या सर्व अद्ययातव तपासणी यंत्रणा एका छताखाली त्यानिमित्ताने जिल्ह्यातील रुग्णांसाठी उपलब्ध असेल. बायोथेसीओमीटर, डॉप्लर, कम्प्युटराईज फूट स्कॅनिंग, नखांचे विविध आजार, नखांची निगा, नखे कापणे, पायांच्या नसा, शिरा, जखमा यांची विशेष काळजी, गरजेनुसार रुग्णांच्या पायानुसार आणि गरजेनुसार डायबेटिक फूट वेअर, आहार सल्ला, मधुमेह नियंत्रण सल्ला, गरजेनुसार x ray, CT scan, पायांची सोनोग्राफी अशा अनेक सुविधा येथे उपलब्ध असणार आहेत. तरी रुग्णांनी नावे नोंदणी करून आपल्या पायांच्या तपासण्या वेळोवेळी करून घ्याव्यात आणि पायांचे होणारे आजार टाळावेत अधिक माहितीसाठी ९८५२१०८१०८ येथे संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. मयुर नागवेकर व डॉ. मिनल नागवेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!