*कोकण Express*
*खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने शाळांना सॅनिटायझर स्टँड चे वाटप*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने १५ व्या वित्त आयोगातून खारेपाटण शहर अंतर्गत येणाऱ्या एकूण ६ जि.प. शाळांसह १ हायस्कुल अशा एकूण ७ शाळांना सॅनिटायझर स्टँड व हॅन्ड सॅनिटायझर प्रत्येकी ५ लिटर चे कॅन सर्व शाळांना वाटप नुकतेच खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्या शुभहस्ते ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले.
यावेळी खारेपाटण जि.प.केंद्र शाळेचे मुख्यध्यापक प्रदीप श्रावणकर, खारेपाटण हायस्कुलचे पर्यवेक्षक संजय सानप, जि.प.शाळा रामेश्वर नगर च्या मुख्यध्यापिका .पडोळकर मॅडम,जि.प.उर्दू शाळा बंदरवाडी चे मुख्यध्यापक रुबाब फकीर,जि.प. शाळा हसोळटेंम्ब -कोंडवडी चे मुख्यध्यापक कासार सर, जि.प.उर्दू शाळा काझीवाडी चे मुख्यध्यापक सय्यद सर तसेच जि. प.शाळा टाकेवाडी(संभाजी नगर) शाळेचे मुख्यध्यापक तेरवणकर सर,खारेपाटण ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी जि.सी.वेंगुर्लेकर आदी शाळांचे मुख्यध्यापक,शिक्षक व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने तसेच शाळामधील स्वछता राखण्याच्या उद्देशाने व विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी गावच्या विकास आराखड्या मध्ये निधीची विशेष तरतूद करून १५ व्या वित्त आयोगातून खारेपाटण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांना एकूण ७ सॅनिटायझर स्टँड व सर्व शाळांना मिळून सुमारे ३५ लिटर हॅन्ड सॅनिटायझर चे वाटप केले असल्याचे खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी यावेळी सांगितले.तर सर्व शाळांनी व शिक्षकांनी खारेपाटण ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त करून समाधान व्यक्त केले.