*कोकण Express*
सामाजिक कार्यकर्ते सुहास तर्फे यांचे दु:खद निधन
*कुडाळ ः प्रतिनिधी*
जांभवडे,बामणवाडी ता.कुडाळ येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रगत शेतकरी सुहास शिवराम तर्फे (४७)यांचे अल्प आजाराने कणकवली येथे खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान दु:खद निधन झाले.कै.सुहास तर्फे हे हरहुन्नरी कार्यकर्ते होते.जांभवडे गावातील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमात ते हिरीरीने सहभागी होत असत.कै.सितारम तर्फे चॅरिटेबल ट्रस्ट,जांभवडे व श्री देव क्षेत्रपाल उत्कर्ष मंडळ जांभवडे बामणवाडी यांच्या माध्यमातून आयोजित विविध उपक्रमात ते अग्रभागी असत.मनमिळावु, दुसऱ्याला मदत करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे यामुळे ते सर्व परिचित होते.त्यांच्या अकाली जाण्याने जांभवडे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, वडील,,काका भाऊ,चुलत बंधू असा परिवार आहे.सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री वामन तर्फे यांचे ते चुलत बंधू होत.