स्वतंत्र कोकण राज्यनिर्मितीसाठी आता “ अरे खय न्हेवन ठेवलास कोकण आमचा ! नाट्यप्रयोग

स्वतंत्र कोकण राज्यनिर्मितीसाठी आता “ अरे खय न्हेवन ठेवलास कोकण आमचा ! नाट्यप्रयोग

*कोकण Express*

*स्वतंत्र कोकण राज्यनिर्मितीसाठी आता “ अरे खय न्हेवन ठेवलास कोकण आमचा ! नाट्यप्रयोग*

*कणकवली  ः मयुर ठाकूर*

स्वतंत्र कोकण राज्याची निर्मिती लवकरात लवकर व्हावी म्हणून प्रा . महेंद्र नाटेकर लिखित ‘ अरे खय न्हेवन ठेवलास कोकण आमचा ‘ ह्या नाटकाचे प्रयोग कोकणात सर्वत्र केले जाणार आहेत . • रत्नागिरीचे प्रख्यात नाटककार व नाट्य व्यावसायिक शिवाजी कृष्णा मालवणकर यांनी ही जबाबदारी स्विकारली आहे. यावेळी मालवणकर म्हणाले , हे नाटक बसवून श्रोत्यांना कलानंद देत असतानाच स्वतंत्र राज्यनिर्मितीची प्रेरणाही मिळणार आहे .

म्हणून मला आनंद होत आहे . यावेळी नाटककार शिवाजी मालवणकर यांना “ अरे खय न्हेवन ठेवलास कोकण आमचा ” ची प्रत देण्यात आली.देताना स्वतंत्र कोकणचे संस्थापक अध्यक्ष प्रा . महेंद्र नाटेकर , रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ए . के . चिलवान , मालवणकर यांचे सहकारी दामोदर कोलतेकर व स्वतंत्र कोकणचे विश्वनाथ केरकर उपस्थित होते . स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सुकर प्रशासनासाठी भाषावार प्रांतरचना करण्यात आली केरळ , तामिळनाडू , गोवा ह्या सागरी राज्याप्रमाणे गोवा बॉर्डर ते डहाणू पर्यंत ७२० किलो मिटर लांब व सह्याद्री ते समुद्रापर्यंत ६५ किलो मिटर रुंद असलेल्या कोकणचे राज्यघटनेनुसार कोकण राज्य निर्माण करणे आवश्यक असताना कोकणचा समावेश महाराष्ट्र राज्यात करुन उर्वरित महाराष्ट्राने नोकऱ्या उद्योगधंदे , पर्यटन , शिक्षण , वैद्यकीय सुविधा इत्यादी बाबतीत महाराष्ट्र सर्वार्थाने कोकणचे शोषण केले व करीत आहे . कोकण विभागातील लोक प्रतिनिधींनी संसदेत व विधिमंडळात आवाज उठवून कोकणावर होणारा अन्याय दूर करणे आवश्यक होते . कारण त्यामुळे कोकणचे शोषण थांबणार आहे . त्यामुळे वेगळ्या राज्याची मागणी करणे आवश्यक होते व आहे . पण ते खऱ्या अर्थाने लोक प्रतिनिधी नसून ते पक्षप्रतिनिधी असल्याने स्वतंत्र कोकण राज्याची मागणी करत नाहीत . मिझोराम , झारखंड , छत्तीसगड , तेलंगण इत्यादी १० राज्यांच्या लोकप्रतिनिधींनी संसदेत व विधीमंडळात आवाज उठवून आंदोलने करुन आपली स्वतंत्र राज्ये निर्माण केली .

लोक प्रतिनिधी स्वतंत्र कोकणराज्य निर्मिती साठी प्रयत्न करीत नाहीत व म्हणून २००३ साली स्वतंत्र कोकण संघर्ष संघटनेची निर्मिती करुन गोवा बॉर्डर ते मुंबईसह डहाणूपर्यंत सभा घेऊन व आंदोलने करुन स्वतंत्र कोकण राज्याची निर्मिती करावी . म्हणून युध्द पातळीवर प्रयत्न केले . मंत्रालयात घुसलो . आझाद मैदानावर प्रचंड सभा घेतल्या . सर्व कोकणी लोकांनी ” कोकण राज्य होवकच व्हया ” च्या बुलंद घोषणा दिल्या . आज कोकणाला ज्या ५/१० टक्के नोकऱ्या मिळतात . त्याऐवजी केरळ , तामिळनाडू , तेलंगण राज्याप्रमाणे १०० % नोकऱ्या कोकणवासियांना मिळतील . दिडशे इंच पाऊस पडून धरणा अभावी सारे पाणी समुद्रात त्या ऐवजी सर्व धरणे बांधून सर्व कोकण सुजलाम सुफलाम होऊन कोकण सुजलाम सुफलाम होईल . देवगड , जयगड , विजयदुर्ग इत्यादी जागतिक दर्जाची बंदरे विकसित करुन व्यापार उद्योग वाढेल . पर्यटन बहरेल . कोकण राज्य देशातील एक नंबरचे सुखी समृध्द राज्य बनेल . असे सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!