*कोकण Express
*देवगड जामसंडे नगरपंचायतमध्ये सेना राष्ट्रवादीचा गट स्थापन*
*संतोष तारी यांची गटनेतेपदी निवड*
*देवगड ः अनिकेत तर्फे*
देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने गट स्थापन केला असून तसे लेखी पत्र अप्पर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना दिले आहे. या महाविकास आघाडीच्या गटनेतेपदी गट प्रमुख संतोष तारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या वेळी शिवसेना नेते संदेश पारकर, जिल्हा प्रमुख संजय पडते, तालुका प्रमुख विलास साळसकर, शिवसेना व राष्ट्रवादीचे सर्व विजयी उमेदवार उपस्थित होते.