पुन्हा राज्यातील शाळांची घंटा वाजणार

पुन्हा राज्यातील शाळांची घंटा वाजणार

*कोकण Express*

*पुन्हा राज्यातील शाळांची घंटा वाजणार …*

*संसर्ग कमी असलेल्या ठिकाणी तात्काळ अंमलबजावणी*

*शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड*

*सिंधुदुर्ग*

कोरोना आणि ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या शाळा पुन्हा एकदा सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आहे. प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी या शाळा सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. कोरोना व ओमायक्रोनचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी शाळा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी काही शैक्षणिक संस्थांनी तसेच पालकांनी केली होती.

या पार्श्वभूमीवर सरकारकडून सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी करोना संसर्ग कमी आहे त्या ठिकाणी या शाळा सुरू करण्यात येणार आहे, असे सौ.वर्षा गायकवाड म्हणाल्या. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!