*कोकण Express*
*होडावडा उपसरपंचपदी राधिका दळवी बिनविरोध*
*वेंगुर्ला : प्रतिनिधी*
होडावडा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी शिवसेनेच्या महिला विभाग संघटीका तथा ग्रामपंचायत सदस्या अनन्या धावडे यांची बिनविरोध निवड झाली. ही ग्रामपंचायत सेनेच्या ताब्यात असून यापूर्वीच्या उपसरपंच सौ.राधिका दळवी यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजिनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली.
सौ.धावडे यांची बिनविरोध निवड होताच तालुका प्रमुख बाळू परब, तालुका महिला संघटीका सुकन्या नरसुले, वेंगुर्ला महिला शहर संघटीका मंजुषा आरोलकर, होडावडा सरपंच अदिती नाईक, माजी उपसरपंच राधिका दळवी, विभाग प्रमुख संजय परब, तुळस शाखा पमुख किरण सावंत, होडावडा शाखा प्रमुख परेश मुळीक, उदय दळवी यांनी त्यांचे अभिनंदन केले.