*कोकण Express*
*विनापरवाना वाळू वाहतूक प्रकरणी कणकवलीत एकावर कारवाई…*
*पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*
*पाच हजाराच्या वाळूसह ट्रॅक्टर जप्त…*
*कणकवली : मयुर ठाकूर*
विनापरवाना वाळू वाहतूक केल्याप्रकरणी एकावर पोलिसांनी कारवाई केली आहे. गणपत अण्णाप्पा चौगुले रा.मधलीवाडी, असे त्याचे नाव आहे. ही कारवाई आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नरडवे चौकात करण्यात आली. यात त्याच्याकडून पाच हजार रुपयांची वाहतूक होत असलेली वाळू व ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केला आहे. तर संबंधिता विरोधात कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी कृष्णात मेथे यांनी पोलीसात फिर्याद दिली असून, त्यानुसार ट्रॅक्टरचालक गणपत चौगुले याच्या विरोधात भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.