*कोकण Express*
*देवगड न.पं.चे नवनिर्वाचित नगरसेवक संतोष तारी यांनी घेतली आम. नाईक यांची सदिच्छा भेट…!*
*देवगडच्या विकासाबाबत केली चर्चा…!*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या निवडणूकीचे कालच निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत शिवसेनेचे आठ तर राष्ट्रवादीच्या एक महिला उमेदवार विजयी होत याठिकाणी महाविकास आघाडीची एक हाती सत्ता आली आहे. या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक तथा महा विकास आघाडीचे गटनेते संतोष तारी यांनी आमदार वैभव नाईक यांची विजय भवन येथे सदिच्छा भेट घेतली यावेळी देवगडच्या विकासाबाबत व नियोजित कामाबाबत चर्चा देखील केली.यावेळी आमदार वैभव नाईक यांनी त्यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.