*कोकण Express*
*ऑनलाईन शेतकरी नोंदणी व भातखरेदीस 31 मार्च द्यावी मुदतवाढ*
*माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची पालकमंत्र्यांकडे मागणी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भातखरेदी योजनेंतर्गत ऑनलाईन शेतकरी नोंदणी आणि भातखरेदीस 31 मार्चपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. भातखरेदी योजनेंतर्गत ऑनलाईन शेतकरी नोंदणी व भातखरेदीस 31 जानेवारी, 2022 पर्यंत अंतिम मुदत आहे. मात्र ऑनलाईन 7/12 मिळण्यास शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्यामुळे अत्यल्प प्रमाणात सिंधुदुर्गात शेतकरी नोंदणी झाली आहे. तसेच 15 डिसेंबर, 2021 पर्यंत सिंधुदुर्गात पाऊस पडत होता. त्यामुळे भातखरेदी केंद्र सुरु होण्यास विलंब झाला आहे. भातखरेदी केंद्र उशिराने सुरू झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे भातखरेदी करणे 31 मार्च, 2022 अखेर शक्य होणार नाही. तरी याबाबत अन्न व नागरी पुरवठा सचिव विजय वाघ यांच्याशी चर्चा करून निर्णय द्यावा, अशी मागणी सावंत यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.