*कोकण Express*
*दोडामार्ग निवडणूकीत भाजपाचा विजय, शिवसेना,राष्ट्रवादीला दणका*
कसई-दोडामार्ग निवडणूकीत भाजपाने महाविकास आघाडीचा सुफडा साफ केला आहे. त्या ठिकाणी भाजपाला १०, शिवसेनेला २, राष्ट्रवादी १ अशी जागा मिळाली आहे. यात माजी नगराध्यक्ष संतोष नानचे हे निवडून आले आहेत. तर विद्यमान माजी नगराध्यक्षा लिना कुबल यांचा पराभव झाला आहे.तर भाजपाचे राजेश प्रसादी यांची पत्नी संध्या प्रसादी अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. निवडणूकीचा निकाला लागल्यानंतर त्या ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यानी जल्लोष केला. यावेळी “राणे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है” अशा घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला.
यात प्रभाग १ मधून भाजपाचे रामचंद्र मणेकरीकर,२ मधून राष्ट्रवादीचे रामचंद्र ठाकुर,३ मध्ये भाजपाच्या गौरी पावसकर,४ मध्ये शिवसेनेच्या वासंती मयेकर,५ मध्ये भाजपाच्या सोनल म्हावळणकर,६ मध्ये शिवसेनेचे रामराव गावकर,७ मध्ये लॉटरी पध्दतीने भाजपाचे देविदास गवस हे विजयी झाले आहेत.प्रभाग ८ मध्ये भाजपच्या विजयी नगरसेवक प्रसादी यांची पत्नी संध्या प्रसादी या अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. १० मध्ये संतोष नानचे भाजप तर ११ मध्ये भाजपाचे नितीन मणेरीकर विजयी झाले आहेत.