वेंगुर्ले-कुडाळ रस्त्याचे आमदार दिपक केसरकर व वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

वेंगुर्ले-कुडाळ रस्त्याचे आमदार दिपक केसरकर व वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

*कोकण Express*

*वेंगुर्ले-कुडाळ रस्त्याचे आमदार दिपक केसरकर व वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन…*

*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला मठ- कुडाळ- पणदूर- हुमरमळा- जांभवडे- घोडगे- गारगोटी या राज्यमार्ग १७९ रस्त्यावरील ११.८५० किमी रस्त्याची सुधारणा व डांबरीकरण या कामाचे तसेच याच रस्त्यावरील वेतोरे शंभू भवानी स्टॉप नजीकच्या पुलाचे बांधकाम करणे या कामांची भूमिपूजन १७ जानेवारी रोजी आमदार दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते वेतोरे येथे संपन्न झाले.

५०/५४ मार्ग व पूल यावरील भांडवली खर्च अंतर्गत सुमारे ११ किमी रस्त्यासाठी २.५ कोटी तर पुलासाठी सुमारे १ कोटी ३७ लाख एवढ्या रक्कमाना मंजुरी देण्यात आली आहे. आमदार दिपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांनी नागरिकांना दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती केली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य एम के गावडे, शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, शहरप्रमुख अजित राऊळ, सरपंच पपु चीचकर, वायंगणी सरपंच सुमन कामत, आधार फाउंडेशनचे नंदन वेंगुर्लेकर, माजी पं स उपसभापती स्वप्निल चमणकर, आडेली माजी सरपंच प्रकाश गडेकर, शिवसेना ओबीसी सेल तालुकाध्यक्ष नितीन मांजरेकर, मठ उपसरपंच निलेश नाईक, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, युवासेनेचे मितेश परब, शिवसेना महिला संघटक सुकन्या नरसुले, महिला शहर संघटक मंजुषा आरोलकर, दादा सारंग, नित्यानंद शेणई, ग्रा प सदस्य बंड्या पाटील, शाखाप्रमुख नाना वालावलकर, योगेश तेली, रुपेश मुंडये यांच्यासाहित शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

या रस्त्याला २ वर्षापूर्वीच पैसे दिले होते. मात्र कोरोनाचा काळ असल्याने या प्रतिबंध उपाययोजना साठी प्राधान्य दिलं गेलं. त्यामुळे काम मागे राहिली होती. आता ती सर्व कामे सुरू झाली आहेत. दरम्यान हा रस्ता व पुला संदर्भात कंत्राटदाराना योग्य सूचना देण्यात आल्या असून कामात दिरंगाई झाल्यास पर्यायी कडक पावले उचलण्यात येतील असे यावेळी आमदार दिपक केसरकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!