*कोकण Express*
*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भाजपा सिंधुदुर्गच्या वतीने निषेध : प्रसंन्ना ऊर्फ बाळु देसाई*
देशाच्या पंतप्रधानांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वक्तव्य केले. नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेलं वक्तव्य अत्यंत लांच्छनास्पद आहे. या वक्तव्याचा भाजपा सिंधुदुर्गच्या वतीने निषेध करण्यात आला. पंतप्रधान पदावर असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाबाबत अशा प्रकारे गरळ ओकण्याची महाराष्ट्राची संस्कृती मुळीच नाही. ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असा कारभार माजवून संपूर्ण देशभरात महाराष्ट्राची बदनामी करण्याचं काम पटोले करत आहेत. त्याबद्दल तिथेच यांची आणि यांच्या पक्षाच्या संस्कारांची उंची कळते. मोदींचे कर्तृत्व आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला ठेच पोहोचवणे तुमच्या दिल्लीतील पक्षप्रमुखांनाही जमलं नाही, कारण त्यांचे कार्यच तितके महान आहे. या शब्दात भाजपा कार्यकर्ते निषेधार्थ व्यक्त होत आहे. असे पटोलेंच्या या वक्तव्याचा भाजपा सिंधुदुर्ग कडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.