*कोकण Express*
*वाभवे – वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीची उद्या मतमोजणी : प्रशासन सज्ज*
*वैभववाडी : प्रतिनिधी*
वाभवे- वैभववाडी नगरपंचायत निवडणूकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. या मतमोजणीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहीले आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाने तयारी केली आहे. १७.जागांसाठी एकूण ४७ उमेदवारांचे भवितव्य उद्या उघड होणार असल्यामुळे सर्वांना उत्सुकता लागली आहे.
वैभववाडी ताहसिल कार्यालयातील हाॕलमध्ये मतमोजणी करण्यात येणार असून सकाळी १० वा.पासून मतमोजणी होणार आहे. १७ प्रभागासाठी ४ टेबल लावण्यात आली आहेत. एकावेळी चार प्रभागाची मतमोजणी करण्यात येईल. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून ही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.