*कोकण Express*
*जानुन घ्या ! कशा आहेत धार्मिक स्थळे चालू करण्याबाबतच्या गाइलाईन्स – महत्वाचे अपडेट ,प्रत्येकाने वाचा*
*उद्या सोमवार 16 नोव्हेंबर पासून राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे*
यामध्ये महत्वाचे म्हणजे ज्येष्ठ नागरिक, गर्भवती, लहान मुले किंवा व्याधीग्रस्तांनी प्रवेश टाळावा, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
*पहा कशा आहेत गाइलाईन्स*
धार्मिक स्थळांच्या गेटवर हँड सॅनिटायझर आणि थर्मल स्कॅनर आवश्यक असणार – तसेच मास्क घातलेल्यांनाच याठिकाणी प्रवेश द्यावा
बूट, चप्पल शक्यतो गाडीमध्ये किंवा स्टॅंडमध्ये प्रत्येक स्लॉटमध्ये वेगळ्या ठेवावे तसेच धार्मिक स्थळी सोशल डिस्टंसिंगच पालन करण्यासाठी जागा निश्चित करण्यात यावी
दर्शन रांगेत दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फूट अंतर अत्यावश्यक आहे तसेच देवाची मूर्ती किंवा पुतळ्याला स्पर्श करता येणार नाही याची काळजी घ्यावी,
लोकांची गर्दी होईल असे कार्यक्रम करू नयेत , तसेच संसर्ग पसरण्याची भीती असल्याने एकत्र येऊन गाणी, भजन म्हणू नयेत
धार्मिक स्थळी प्रसाद वाटप किंवा पवित्र पाणी भाविकांच्या अंगावर शिंपडलं जाऊ नये -धार्मिक स्थळाची वेळोवेळी स्वच्छता करण्यात यावी
सामूहिक प्रसादाची (भोजनाची) व्यवस्था असणाऱ्या ठिकाणी नियम अंतर पाळून प्रसाद वाटपास परवानगी आहे
लक्षणं असलेला व्यक्ती आढळल्यास त्याला तातडीने वेगळ्या खोलीत ठेवावं मास्क देण्यात यावा , तसेच तातडीने जवळच्या रुग्णालयाला माहिती द्यावी.