*कोकण Express*
*आंबोली येथे बेकायदेशीर दारू वाहतुकीवर कारवाई…*
*तब्बल १२ लाख ३५ हजाराचा मुद्देमाल जप्त; संशयित ताब्यात*
*आंबोली ः प्रतिनिधी*
गोवा बनावट दारूची बेकायदेशीररीत्या वाहतूक केल्या प्रकरणी सावंतवाडी मधून पुणे येथे जाणाऱ्या इनोवा कारवर आंबोली येथे कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल १२ लाख ३५ हजार ७०० रुपयाचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एका संशयितास ताब्यात घेण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.