*कोकण Express*
*श्री रासाई देवीच्या यात्रेनिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न…*
*२७ रक्तदात्यानी केले रक्तदान*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
वैभववाडी तालुक्यातील अचिर्णे गावातील श्री रासाई देवीच्या यात्रे निमित्ताने अचिर्णे ग्रामपंचायत येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराच्या निमित्ताने २७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
श्री.रासाई देवी जनकल्याण बहुउद्देशीय संस्था आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान तसेच राजेश पडवळ चॅरीटेबल ट्रस्ट वैभववाडी यांच्यावतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वैभववाडीचे तहसीलदार रामदास झळके यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी नुतन जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल पवार, सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष राजेश पडवळ, सुशील रावराणे, स्वप्निल दर्डे, शेखर रावराणे, अविनाश दर्डे, शंकर ( दादा ) रावराणे, डॉ. मनोज रावराणे, माजी सैनिक पुंडलिक दर्डे, पंडित रावराणे, सुभाष रावराणे, दिपक रावराणे तसेच ओरस ब्लड बँकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ सौरभ लिहीतकर, भारती भोसले, किशोर नांदगावकर, उल्हास राणे, नितीन गावकर आदी मान्यवर व पदाधिकारी तसेच रक्तदाते उपस्थित होते.