*कोकण Express:*
*सावंतवाडीसह जिल्ह्यात ठीक – ठिकाणी अवकाळी पाऊस*
*आंबा काजू बागायतदारांना मात्र बसणार याचा मोठा फटका*
*पावसाचे अचानक लहरी षटकार सुरू*
*सिंधुदुर्ग :*
सावंतवाडीत अचानक पावसाने हजेरी लावल्याने फिरत्या विक्रेत्यांसहा नागरिकांची तारांबळ उडाली. सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तापमानात काही अंशांनी वाढ झाली होती. आणि अचानक संध्याकाळी ४.३० च्या सुमारास हलक्या स्वरूपात पावसाने हजेरी लावली. आणि हळूहळू पावसाची सर वाढू लागलली. या पावसानी वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आता या पावसाच्या सरींनी पुन्हा एकदा शेतकर्यांच्या डोकेदुखीत वाढ की काय..? असा प्रश्न पडू लागला आहे.