*कोकण Express*
*आम.राणेंचा जमीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळल्या नंतर ……*
*खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया…*
*…त्यामुळे प्रत्येकाला करावे तसे भरावेच लागते असा उपरोधिक टोलाही लगावला*
*मुंबई : प्रतिनिधी*
आमदार नितेश राणे यांचा अटक पूर्व जामीन अर्ज आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यावेळी त्यांनी सांगितले की आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे. तसेच येथील न्यायव्यवस्था सक्षम आणि सुरक्षित असल्याचे न्याय व्यवस्थेने दाखून दिले आहे. त्यामुळे प्रत्येकाला करावे तसे भरावेच लागते असेही त्यांनी यावेळी सांगितले .