*कोकण Express*
*पत्रकार सतीश साळगांवकर यांना मातृशोक*
*कणकवली : मयुर ठाकूर*
कणकवली विद्यानगर येथील रहिवासी श्रीमती प्रभावती नामदेव साळगांवकर ( ८८ ) यांचे रविवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले . त्यांच्या पश्चात मुलगे , एक विवाहित मुलगी , सुना , नातवंडे , पतवंडे असा मोठा परिवार आहे .
कणकवली एसटी स्थानकातील सेवानिवृत्त स्थानकप्रमुख राजन साळगांवकर तर ज्येष्ठ पत्रकार सतीश साळगांवकर यांच्या त्या मातोश्री होत . साईकृपा फॅब्रिकेशनचे ज्ञानेश्वर दीपनाईक यांच्या त्या सासू होत .

