जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत रेवतळे मालवण विजेता तर पंचक्रोशी फोंडा उपविजेता

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत रेवतळे मालवण विजेता तर पंचक्रोशी फोंडा उपविजेता

*कोकण Express*

*जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत रेवतळे मालवण विजेता तर पंचक्रोशी फोंडा उपविजेता*

*कासार्डे ः  संजय भोसले*

तळेरे वाघाचीवाडी येथील श्री शेवरादेवी क्रिडा मन्डळाने आयोजित केलेल्या भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत उत्कंठावर्धक अंतिम सामन्यात रेवतळे मालवण संघाने विजेतेपद तर पंचक्रोशी फोंडा संघाने उपविजेतेपद पटकाविले. या संघांना रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत 16 संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील अंतिम विजेत्या रेवतळे मालवण संघाला रोख रु. 7 हजार 1, उपविजेत्या पंचक्रोशी फोंडा संघाला रोख रु. 5 हजार 1 व प्रत्येकी चषक देऊन गौरविण्यात आले. तर तृतीय विजेत्या जयभवानी सावंतवाडी आणि सिंधुपूत्र कोळोशी या संघांना प्रत्येकी रोख रु. 2 हजार 1 व चषक देण्यात आला. वैयक्तीक पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट चढाई जतीन कांबळी (रेवतळे मालवण), उत्कृष्ट पकड भुपेश राणे (पंचक्रोशी मालवण) तर अष्टपैलू खेळाडू म्हणून विवेक नेवाळे (रेवतळे मालवण) यांना प्रत्येकी रु. 251 व चषक देऊन गौरविण्यात आले.

ही संपुर्ण स्पर्धा स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष राजू वळंजू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तरुण मित्र मन्दळाच्या सहकार्याने पार पडली. या स्पर्धेसाठी तळेरे वाघाचीवाडी व मुंबई मँड़ळाने विशेष सहकार्य केले. या स्पर्धेदरम्यान विविध मान्यवरांनी भेट देऊन स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. यावर्षी प्रथमच जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे नीटनेटके आयोजन करण्यात आले होते. पुढिलवर्षी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल, असे यावेळी जाहिर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!