प्रज्ञांगणही नावलौकिक मिळवेल : पद्मश्री परशुराम गंगावणे

प्रज्ञांगणही नावलौकिक मिळवेल : पद्मश्री परशुराम गंगावणे

*कोकण Express*

*प्रज्ञांगणही नावलौकिक मिळवेल : पद्मश्री परशुराम गंगावणे* 

*तळेरे येथे प्रज्ञांगण व्यासपीठाचे शानदार उद्घाटन*

*कासार्डे ः  संजय भोसले*

ठाकर आदिवासिंचे कलांगण आणि आपले हे प्रज्ञांगण हे दोन्हीही भाउच आहेत. ज्या कलांगणने देश परदेशात नाव कमावले तसाच नावलौकिक प्रज्ञांगण मिळवेल, याची मला खात्री आहे. या व्यासपीठाचे उद्घाटन संपुर्ण जिल्ह्याच्यावतीने झाले असल्याचे प्रतिपादन पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी केले. तळेरे येथील प्रज्ञांगण या व्यासपीठाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. मुलांमध्ये विविध कला कौशल्य विकसित करून त्यांच्यात अंतर्बाह्य बदल घडवून आणण्यासाठी तळेरे येथे प्रज्ञांगण हे व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे.

यावेळी व्यासपिठावर उद्घाटक पद्मश्री परशुराम गंगावणे, वैभववाडी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रणय तेली, वैभववाडी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. नामदेव गवळी, एकनाथ गंगावणे आणि चेतन गंगावणे आदी उपस्थीत होते. यावेळी प्रज्ञांगण या व्यासपीठाचे उद्घाटन पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते करण्यात आले.

दोन सत्रांमध्ये हा कार्यक्रम पार पडला. सकाळच्या पहिल्या सत्रात “प्रज्ञांगण” या व्यासपीठाचा शुभारंभ, हस्ताक्षर संग्राहक निकेत पावसकर यांच्या “अक्षरोत्सव” प्रदर्शनाचे उद्घाटन, रांगोळीकार उदय दुदवडकर यांनी साकारलेल्या रांगोळीचे उद्घाटन पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते करण्यात आले. तर दुसऱ्या सत्राची सुरुवात एकनाथ गंगावणे व चेतन गंगावणे यांनी परंपरागत चित्रकथी या कलेचे प्रात्यक्षिक दाखवून झाली.

दुसर्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती, संमोहन, अवघड गणिताची सोपी पद्धत याबाबत सदाशिव पांचाळ, चित्रकलेबाबत अक्षय मेस्त्री, मूर्तिकलेबाबत उदय दुदवडकर, गायनाबाबत विश्रांती कोयंडे, अभिनयाबाबत प्रमोद कोयंडे, नृत्याबाबत रोशन जंगम यांनी तर प्रथमेश पौळ, रिना दुदवडकर, श्रावणी मदभावे, सतिश मदभावे यांनी विविध मनोरंजक खेळ घेतले. यामध्ये प्रात्यक्षिके करताना मुलांनी शिबिराचा आनंद लुटला.

स्पर्धेच्या युगात, कोरोना काळामध्ये जगात प्रचंड बदल झाले आहेत. नोकऱ्या मिळवणं आधीच कठीण होतं आणि आता ते महाकठीण झाल आहे. केवळ पदवीधर होऊन नोकरी मिळण्याचे दिवस संपले आहेत. विविध कला कौशल्य अंगी असतील तरच या पुढील काळात नोकरी-व्यवसायात सोबत अन्य क्षेत्रातही मार्गक्रमण करणे शक्य होईल. त्यासाठी लहान वयातच कला कौशल्यांचा पाया घातला गेला पाहिजे. या उद्देशानेच प्रज्ञांगण ची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती रिना दुदवडकर हिने दिली. रोजगाराभिमुख कंप्युटरचे अनेक अभ्यासक्रम, सहज सोप्या पद्धतीने गाणं शिकणं, नृत्य कलेचे प्रशिक्षण, वैविध्यपूर्ण चित्रकला, रांगोळी, शिल्पकला, जलद गतीने अभ्यास करण्याचे तंत्र, हार्मोनियम, तबला वादन प्रशिक्षण, प्रभावी भाषण करण्याची कला, रविवारची विज्ञान शाळा असे विद्यार्थी विकासकेंद्री उपक्रम राबविले जाणार आहेत.

यावेळी प्रज्ञांगणच्या वतीने पद्मश्री परशुराम गंगावणे यांना शाल, श्रीफळ आणि मानपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला. तर प्रणय तेली यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. जयप्रकाश परब आणि प्रणय तेली यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे, प्रा. कोकाटे, गवाणे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. एच. मुल्ला, स्व. सुनिल तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, संतोष टक्के, संजय नकाशे, जाकिर शेख, युवराज पचकर, वारगाव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत वाळके, तळेरे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. जी. नलगे, रामकृष्ण राणे, विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाचे प्रा. हेमंत महाडिक, प्रणील शेट्ये, विद्यार्थी – पालक आणि प्रज्ञांगण परिवाराचे उदय दुदवडकर, सदाशिव पांचाळ, प्रमोद कोयंडे, विश्रांती कोयंडे, निकेत पावसकर, नेत्रा पावसकर, सतीश मदभावे, श्रावणी मदभावे, अक्षय मेस्त्री, रीना दुदवडकर, प्रणाली मांजरेकर, प्रथमेश पौळ, राहुल सोमले, गौरी सारंगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रीना दुदवडकर व प्रणाली मांजरेकर यांनी तर आभार सदाशिव पांचाळ यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!