*कोकण Express*
*बी के तांबे यांच्या स्वप्नपूर्तीचा दशावतारी नाट्यप्रयोग २० जानेवारी रोजी*
*दशावतार नाट्य प्रेमींनी कोरोनाचे नियम पाळून उपस्थित राहण्याचे आवाहन*
*कणकवली : मयुर ठाकूर*
कै. बी, के, तांबे,थोर दशावतारी कलावंत. ज्यांच्या कलेचा सन्मान महाराष्ट्र शासनाने ,लोककला पुरस्कार देऊन केला.अशा या थोर कलावंताची उणीव आजही सर्वांना भासते.
त्यांचे देहावसान होऊन बरेच महिने झाले. पण ज्या पहाटे त्यांचा मृत्यू झाला त्या रात्री त्यांनी कित्येक त्यांच्या चाहत्यांना फोन करून मनातील इच्छा प्रगट केली होती. ती इच्छा म्हणजे दशावतारी नाटक करण्याची. ज्या शाळेच्या स्टेजवर त्यांनी ४० वर्षांपूर्वी नाटकाची सुरुवात केली. त्याच शाळेच्या स्टेजवर शेवटचे नाटकं करताना मी स्वतः अंगाला रंग लावून शेवटची भूमिका करणार आहे. असे बी के तांबे यांनी सांगितले होते. आपल्या गावातील जनतेच्या प्रेमापोटी आणि सहकार्यामुळे आपण इथवर पोहचलो. त्या आपल्या गावच्या लोकांना मी काही देऊ शकत नाही. पण शेवटच्या नाटकात रंग लावून काम करून माझ्या गावाची लोकांची सेवा करायची आहे. असं त्यांची इच्छा होती. व ती त्यांनी अनेक जणांना त्या अंतिम रात्री बोलून दाखवली होती. परंतु ती इच्छा मात्र पूर्ण होऊ शकली नाही. परंतु त्यांनी दिलेली हाक हळवल वासियांनी पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. कोरोना च्या महामारीमुळे त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी विलंब लागला. सर्वांच्या सहकार्यातुन श्री. तांबे यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यात येणार आहे. कै. बी,के, तांबे यांचे अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. हळवलं गावचे नाव महाराष्ट्रच नव्हे तर देशभर गाजवले. त्यांचा एक सन्मान आणि त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक दशावतारी नाटक २० जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आले आहे. हळवल शाळा नंबर १ च्या बाजूला या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. भालचंद्र दशावतार नाट्य मंडळाचा हा बी के तांबे यांच्या स्वप्नपूर्तीचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. त्या वेळी हळवल गावातील ज्या ज्या दशावतारी कलाकारांनी आपले या कलेत योगदान दिले असे सर्वांचा सन्मान करण्यात येणार आहे. बी के तांबे व दशावतार प्रेमींनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना संबंधीचे सर्व नियम काटेकोर पणे पाळून नाटक संपन्न होईल. अशी माहिती बीके तांबे प्रेमी व हळवल ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आली.