*कोकण Express*
*इन्सुलीतील युवकाचे गोवा-बांबुळीत उपचारादरम्यान निधन…*
*काल रात्रीची घटना;ओरोस येथील अपघात झाला होता गंभीर जखमी…*
*बांदा ः प्रतिनिधी*
ओरोस येथे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या इन्सुलीतील युवकाचे गोवा-बांबूळी येथे उपचारादरम्यान निधन झाले.ही घटना काल रात्री उशीरा घडली.ओंकार चौकेकर (१८), असे त्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,ओरोस सामाजिक न्याय भवन येथे हा अपघात घडला होता.यात ओंकार हा गंभीर जखमी झाला होता.दरम्यान त्याला अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी रुग्णालयात हलविण्यात आले होते.त्या ठिकाणी उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.त्याच्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.