देवगडच्या राहुल सारंग याच्या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर निवड!

देवगडच्या राहुल सारंग याच्या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर निवड!

*कोकण Express*

*देवगडच्या राहुल सारंग याच्या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर निवड!*

*कार्बन सक्शन मशीनची राज्यस्तरावरील १०२ प्रकल्पामधून झाली निवड*

*मालवण ः प्रतिनिधी*

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद राज्यस्तरीय प्रदर्शनाचा निकाल जाहीर झाला असून पंतवालावलकर कॉलेज देवगडच्या कु. राहुल प्रदीप सारंग याने सादर केलेल्या Carbon Suction Machine या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. त्याला प्राध्यापक पारस जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण सात प्रकल्प सहभागी झाले होते. पहिल्या फेरीमध्ये लहान गटातून रामगड हायस्कूल मालवणच्या ओमतेज उल्हास तारी व अथर्व बाबूराव मेस्त्री यांच्या ‘वीजबचत’ या उपक्रमास तर मोठ्या गटातून पंतवालावलकर ज्युनिअर कॉलेज देवगडच्या राहूल प्रदीप सारंग याच्या ‘कार्बन सक्शन मशीन’ या उपक्रमास अंतिम सादरी करणाची संधी मिळाली होती. राज्यस्तरावर सादर झालेल्या एकूण १०२ प्रकल्पामधून राहूल सारंग याची राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. हे प्रदर्शन फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यात संपन्न होणार आहे.
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे गेली सत्तावीस वर्षे ‘राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद’ आयोजित केली जाते. राज्यस्तरावर जिज्ञासा ट्रस्ट ठाणे या उपक्रमाचे आयोजन करते. शालेय विद्यार्थ्यांत मुलभूत विज्ञानाची आवड निर्माण व्हावी हे या परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचा या वर्षीचा मुख्य विषय: ”शाश्वत जीवनासाठी विज्ञान.” हा होता. यावर्ष्रीची राज्यस्तरीय बालविज्ञान परिषद ८ व ९ जानेवारी २०२२ रोजी संपन्न झाली.
सिंधुदुर्गचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, शिक्षण विभाग सिंधुदुर्ग, श्री. अविनाश परुळेकर, श्री. सुरेश ठाकूर, बाल विज्ञान परिषद जिल्हा समन्वयक श्री. गुरुनाथ ताम्हणकर, जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील मार्गदर्शक शिक्षक,मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक व पालक यांचे शिक्षणाधिकारी श्री. मुश्ताक शेख यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!