*कोकण Express*
*कणकवली महाविद्यालयात हिंदी विभागाच्यावतीने ‘विश्व हिंदी दिवस’ साजरा!*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात हिंदी विभाग आणि आयक्युएसी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आणि विश्व हिंदी दिवसाच्या अनुषंगाने ‘विश्व हिंदी दिवस’ आभासी (ऑनलाइन )पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने हिंदीतील नामवंत कवींच्या कवितांचे सादरीकरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले यांनी हिंदी भाषेचे वैश्विक पातळीवर महत्त्व विशद केले व कोरोनाच्या सद्यस्थितीवर दोन कविता सादर केल्या.यावेळी हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ. लालासाहेब घोरपडे यांनी’१० जानेवारी हा दिवस हिंदी प्रेमींसाठी खास महत्त्वाचा दिवस असल्याचे सांगून आंतरराष्ट्रीय पातळीवर हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ‘विश्व हिंदी दिवस’ साजरा केला जातो असे स्पष्ट केले.या कार्यक्रमात प्रा.डॉ. अनिल फराकटे, प्रा.युवराज महालिंगे, प्रा.डॉ. भिकाजी कांबळे, प्रा.सीमा हडकर , डॉ.मारोती चव्हाण,प्रा.स्वीटी जाधव,प्रा.दिपा तेंडोलकर व विद्यार्थिनी कु.प्राची केरकर व कु.यशश्री वरक यांनीही कविता सादर केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ. लालासाहेब घोरपडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. भिकाजी कांबळे यांनी केले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होते.

