*कोकण Express*
*क्रांतीज्योती सावित्रीबाई खऱ्या अर्थाने देशातील स्त्रीशिक्षणाच्या जननी- सुनिल नारकर*
*वैभववाडी/प्रतिनिधी*
क्रांतीज्योती सावित्रीबाई खऱ्या अर्थानं देशातील स्त्रीशिक्षणाच्या जननी आहेत. सावित्रीबाईंनी स्त्रीसक्षमीकरणासाठी काम केलं. महिलांवरील अन्यायाविरुद्ध लढा दिला.त्या सत्यशोधक विचारांच्या क्रांतिकारी समाजसुधारक होत्या. देश व देशातील स्त्रीशक्ती क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल कृतज्ञ आहे असे प्रतिपादन भुईबावडा गावचे सुपुत्र, उद्योगपती आणि स्पर्शिका बिल्डर्स अॕन्ड डेव्हलपर्सचे संचालक सुनिल नारकर यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले जयंती निमित्त राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसुर्य महात्मा फुले शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन अविष्कार फाऊंडेशन इंडिया या संस्थेच्यावतीने गणपतीपुळे येथे करण्यात आले होते. यावेळी श्री नारकर बोलत होते. या कार्यक्रमासाठी राज्यभरातील शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे पुरस्कार युवा उद्योजक आणि स्पर्शिका बिल्डर्स अॕन्ड डेव्हलपर्सचे संचालक सुनिल नारकर यांच्या शुभहस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक किसनराव कुराडे, माजी वायूसैनिक एम. डी. देसाई, अविष्कारचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संदीप परटवलकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब हरमलकर, सुनिल पाटील, सौ. सुजाता जांबोटकर, प्रमोद उपाध्याय, सतिश मुणगेकर, राज्य महिला संघटक सुचेता कलाजे, कोल्हापूर जिल्हा महिला संघटक जयश्री पाटील, मिनाक्षी पिसे, वनिता चव्हाण, सुनयना साळवी, वृंदा पारकर, रोहिणी सावंत, डॉ. अनिल देशमाने, सुरेखा देशमाने, मंगल कांबळे, प्राची नाईक यांच्यासह आदीं मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

