*कोकण Express*
*एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या त्वरित मार्गी लावण्यात यावेत*
*वैभववाडी भाजपचे तहसीलदार यांना निवेदन*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या त्वरित मार्गी लावण्यात याव्यात या मागणीचे निवेदन वैभववाडी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. निवेदनातील मागण्या पुढील प्रमाणे – एसटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्याचा संपूर्ण पगार देण्यात यावा, कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यात यावा, महाराष्ट्रातील आघाडी सरकारला कर्मचाऱ्यांच्या पगाराचे गांभीर्य नाही. एसटी महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण व्हावे, कर्मचाऱ्यांचे पगार ठरलेल्या नियमित वेळेत मिळावेत, राज्य सरकारनी जाहीर केलेल्या एका महिन्याची पगाराची घोषणाही तात्पुरती मलमपट्टी आहे. 97 हजार एसटी कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. याला सर्वस्वी जबाबदार ठाकरे सरकार आहे. मनोज चौधरी यांच्यासहित अन्य दोन एसटी कर्मचारी यांच्या आत्महत्येस पूर्णतः महाआघाडी सरकार जबाबदार आहे. एसटी कर्मचारी हे अपूर्ण पगार व त्यातील अनियमिततेमुळे आत्महत्या करीत आहेत. एसटी महामंडळाच्या अंधाधुंदी कार्यपद्धतीस सर्वस्वी ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. वरील सर्व मुद्द्यावर लक्ष टाकून ते प्रश्न मार्गी लावण्यात यावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष नासीर काझी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा सरचिटणीस भालचंद्र साठे, जि. प. सदस्य सुधीर नकाशे, माजी सभापती अरविंद रावराणे, जिल्हा मोर्चा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, माजी सभापती शुभांगी पवार, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष किशोर दळवी, शक्ती प्रमुख रितेश सुतार, नगरसेवक संजय सावंत, संताजी रावराणे, प्रदीप नारकर, दाजी पाटणकर, पिंट्या खानविलकर, सुनील भोगले, संतोष कुडाळकर, रामदास पावसकर, विलास पावसकर, नारायण मांजरेकर, लवू पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.